मुंबई : अभिनेता आदिनाथ ठोकारे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता. आदिनाथ आपल्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतो आणि
सध्या आदिनाथ चर्चेत आहे तो बुर्ज खलिफावर झळकल्यामुळे.. 83 सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला. बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला आदिनाथ हा पहिला मराठी कलाकार असल्याचं बोललं जातंय.
कबीर खान दिग्दर्शित ‘83’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा सिनेमा १९८३ मध्ये रंगलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप आधारित आहे. या मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. या इतिहासिक विजयावर हा सिनेमा आधारित असून या सिनेमात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे तर दीपिका पदुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
तर या सिनेमात आदिनाथ दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या महत्वपूर्ण सिनेमात काम करायला मिळाल्यामुळे आदिनाथ खूष आहे आणि आता तर बुर्ज खलिफावर झळकल्यामुळे त्याच्या आनंदात अधिकच भर पडली आहे.