Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर तातडीने कारवाई करा - छगन भुजबळ

नाशिक : बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ''छत्रपतींचा आशिर्वाद'' असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असा इशारा सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Comments
Add Comment