Thursday, July 18, 2024
Homeमनोरंजनमिलिंद गुणाजीचा मुलगा अभिषेक गुणाजी अडकला लग्न बंधनात

मिलिंद गुणाजीचा मुलगा अभिषेक गुणाजी अडकला लग्न बंधनात

मालवणात पार पडलं अभिषेक-राधाचं लग्न

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द जोडी  मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजीचा लग्न समारंभ  अगदी पारंपरिकरित्या पार पडलाय. अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.

या दोघांच्या हळदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. या दोघांना नेटकरांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या लग्नाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे लग्न मुंबईतल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेलं नाही. तर मालवण येथील एका मंदिरात अगदी पारंपरिकरित्या पार पडलं.

. याबाबत मिलिंद गुणाजीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की , आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत.त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले.”

या लग्नसोहळ्यासाठी अभिषेक, मिलिंद आणि राणी गुणाजी एकदी पारंपरिकरित्या सजले होते…

अभिषेकच्या हळदीला राणी गुणाजीने मस्त ताल धरला.

अभिषेकची पत्नी राधा ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -