Sunday, August 10, 2025

विकासात्मक काम घेऊनच जनतेकडे जाणार : निलेश राणे

विकासात्मक काम घेऊनच जनतेकडे जाणार : निलेश राणे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात आमच्या नगरसेवकांनी आणि उत्कृष्टरित्या विकासात्मक व पारदर्शक काम केले आहे व हे विकासात्मक, पारदर्शक कामच घेऊन आम्ही येथील जनतेकडे जाणार असून तेराही जागांवर आमचे नगरसेवक निवडून येणार असल्याचा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.



निलेश राणे यांच्या हस्ते भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निलेश राणे म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार तसेच येथील विरोधकांकडे आता काहीच मुद्दे नाहीत, विकास कामे केली नाहीत. त्यामुळे विरोधक खोट्या थापा मारून भाजपा पक्ष व आमच्या उमेदवारांना बदनाम करू पाहत आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक या सर्वांनी गेल्या पाच वर्षांत एकही विकास काम केले नाही,अशी टीकाही राणे यांनी विरोधकांवर केली.




मायनिंग साठी वैभव नाईक मंत्रालयात-


आमदार नाईक हे मूळ काँग्रेसवासीय व ठेकेदार आहेत. फावडे कुठे मारायचे ते त्यांना चांगले माहीत आहे. आता कुडाळ, मालवणसाठी नाही तर ते सावंतवाडीमध्ये २२ कोटींचा जो मायनिंगचा साठा आहे तो आपल्याला किंवा त्यांच्या संबंधितांना मिळावा या करिता हे मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असल्याचाही टोला निलेश राणे यांनी लगावला.
Comments
Add Comment