Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

'नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिल्प उभारा’



नवीन पनवेल : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी (Nanasaheb Dharmadhikari) यांचे शिल्प बल्लाळेश्वर तलाव परिसरात उभारावे अशी मागणी पनवेल मनसेने पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी नविन पनवेलचे शहराध्यक्ष पराग बालड, पनवेलचे शहराध्यक्ष संजय मुर्कुटे उपस्थित होते.


सध्या शहरातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर तळ्याच्या सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पनवेल शहरातील पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तळ्याकडे मध्यंतरी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तलावातील गाळ काढण्याच्या नावाने निवीदा निघाल्या. त्यानंतर या तळ्याची, या शहराची खऱ्या अर्थाने निस्वार्थी भावनेने जर कोणी सेवा केली असेल तर ती महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सारख्या व्यक्तीमत्वाच्या सानिध्यात तयार झालेल्या सदस्यांनी. याबद्दल शहराने नानासाहेब धर्माधिकारी यांचे सदैव ऋणी रहायला हवे, असे मनसेने म्हटले आहे.

Comments
Add Comment