नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा एक्स्प्रेस वेची पायाभरणी करणार आहेत. मेरठ ते प्रयागराज दरम्यानचा हा द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेशातील १२ जिल्ह्यांमधून जाणार असून राज्याच्या पश्चिम आणि पूर्वेला जोडणार आहे. हा द्रुतगती महामार्ग देशभरात जलद गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित आहे.
५९४ किमी लांबीचा हा सहा पदरी एक्स्प्रेस वे ३६,२०० कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. हा महामार्ग मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजमधून जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर, हा उत्तर प्रदेशचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग बनेल. द्रुतगती मार्गामुळे औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन क्षेत्रांना चालना मिळणार आहे.