नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील कासारभाट ते डोलघर परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना मिळाली होती. यावेळी विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात बेकायदेशीर वाळू साठा ताब्यात घेण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा आणि साठा करून त्याची विक्री शासनाचे नियम मोडून छुप्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी पनवेल तहसील कार्यालयात येतात. तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी अशीच कारवाई करण्यात येते. अशाच प्रकारे कासारभाट परिसरात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा करण्यात येत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळताच तलाठी, पोलीस पाटील आणि इतर पथकांनी तेथे जाऊन मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला. त्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे पनवेल तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…