नवी दिल्ली : जगातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘मिस वर्ल्ड २०२१’ या सौंदर्यवती स्पर्धेची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मनसा वाराणसी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. ही स्पर्धा कोरोनामुळे आधीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र सौंदर्यवती मनसा हिला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे फायनल पुढे ढकलण्यात आली.
स्पर्धेची अंतिम फेरी पुढील ९० दिवसांत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित करण्यात येणार आहे.