Tuesday, May 13, 2025

मनोरंजनरिलॅक्सताज्या घडामोडी

बिग बॉसमध्ये तीन खास पाहुण्यांसोबत 'Ticket To Finale'चा रंगणार टास्क !

बिग बॉसमध्ये तीन खास पाहुण्यांसोबत 'Ticket To Finale'चा  रंगणार टास्क !
मुंबई  : 'बिग बॉस मराठी' हा रिऍलिटी शो  आता अंतिम टप्प्यात आला आहे.  कालच्या भागामध्ये मीनल 'Ticket To Finale' च्या टास्कमधून बाहेर पडली. आता फिनालेसाठी चुरस रंगणार आहे ती उत्कर्ष, मीरा आणि विशाल....

'तिकीट टू फिनाले'मध्ये पोहचण्यासाठी हे तिघही जीवाचं रान करतील यात शंका नाही. त्यामुळे आता या शोमधली रंगत अधिकच वाढत चालली आहे. इतके दिवस अनेक टास्कमधून स्वत: ला सिध्द करत हे तीघ इथवर येऊन पोहचले आहेत. आता तिकीट टू फिनाले म्हणजे जणू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ जाणं. ही ट्रॉफी हातात घेण्यात आणि या तिस-या सिझनवर विजेता म्हणून आपल्या नावाचं शिक्कामोर्तब करण्यात हे तिघेही उत्सुक आहेत.



या तिघांपैकी कोणत्या सदस्याला मिळणार 'Ticket To Finale' आणि कोण पोहोचणार अंतिम आठवड्यात हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.



तसंच  'Ticket To Finale'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Ticket To Finale' चे टास्क काही खास पाहुण्यांसोबत रंगणार  आहेत. म्हणजेच घरात जाणार आहेत तीन खास पाहुणे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर. झोंबी सिनेमाच्या निमित्ताने हे तिघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता हे तिघं बिग बॉसच्या घरात जाणार असल्यामुळे प्रेक्षकांना एन्टरटेन्मेंटचा डबल डोस मिळणार हे नक्की. 

Comments
Add Comment