Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

येत्या रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेगाब्लॉक

येत्या रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर १९ डिसेंबर, रविवार रोजी १८ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आलं आहे.  गेल्या दहा वर्षांपासून रखडलेलं ठाणे ते दिवा  दोन मार्गिकांच्या कामासाठी हा मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 18 तासांचा आहे.

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. यामध्ये सध्याचे रुळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामेही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आता रविवार, 19 डिसेंबरला 18 तासांच्या मोठ्या मेगाब्लॉकचे एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने नियोजन केले आहे.

Comments
Add Comment