Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडी३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा

३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा

गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट

उल्हासनगर (वार्ताहर) : सदगुरु डेव्हलपर्स ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३७ गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसत तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाअंती मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात आली नसून त्यांच्यापासून आमच्या जिवाला धोका असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले.

कल्याणमध्ये राहणारे किशोर दादलानी यांचा बेकरीचा व्यवसाय असून उल्हासनगरमध्ये कार्यालय आहे. दादलानी यांच्या ओळखीचे गोविंद मनचंदा आणि ओम मनचंदा ह्या दलालांनी संपर्क साधला. त्यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कल्याण आणि उल्हासनगर भागात नव्याने सुरू होत असलेल्या इमारतीमध्ये कमी रक्कमेत दुकाने, घरे अथवा जादा रक्कम परत देण्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून ३८ जणांनी वेळोवेळी एकूण ५ कोटी ५४ लाख रुपयांचे आठ बांधकाम विकासकांच्या कार्यालयात धनादेश दिले होते. काही महिने गुंतवणूकदारांना परतावाही देण्यात आला. त्यानंतर गुंतवणूकदार परतावा मागण्यासाठी २०१९ ला गेले असता त्या आठही जण गुंतवणूकदारांना दिलेल्या रक्कमेचा परतावा न करताच ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -