Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीनियमीत प्रवाशांच्या तिकिटामध्ये होणार बचत

नियमीत प्रवाशांच्या तिकिटामध्ये होणार बचत

बेस्टची विशेष बचत योजना

मुंबई : बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी आणि बेस्टचे प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट विविध योजना राबवत असते. आता देखील बेस्ट उपक्रमाने बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेली योजना निवडणार आहेत.

लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे बेस्टकडे पाहिले जाते. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून दिवसाला २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त दिवसातून बऱ्याचदा अनेकांना बेस्टने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रम आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहे. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.

यापूर्वी देखील बेस्टच्या मॅजिक पास म्हणजे ४० रुपयांच्या तिकिटावर दिवसभर प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता या नवीन योजनेचा प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -