Monday, August 25, 2025

अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

मुंबई : अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल मनसेला जय महाराष्ट्र म्हटले आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

“रुपाली ताईंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असे अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केले.

यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. मी मनसेचा राजीनामा देत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते तसेच यापुढे मी काम करणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते. "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार...", असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >