मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती ‘राज कुंद्रा’ला जुलैमध्ये पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणी अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर मध्ये जामीन मिळाला.
त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाकडून राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती.
राज कुंद्राविरोधात कलम 292, 293 आणि आयटी कायद्याच्या कलम 66E, 67, 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या आयुष्यात घडलेल्या या सर्व घटनांनंतर राज कुंद्राने एक महत्वाचे पाऊल उचलत त्याने आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत.