नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत.
महानगरपालिकेतील आठ सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला असून आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
अशाच प्रकारे मागील सुमारे २० वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर – मदतनीस पदावरून आठ कर्मचाऱ्यांना प्लंबर – फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेसरपदावरून तीन कर्मचाऱ्यांची शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे.
त्याचप्रमाणे १०८ लिपिक-टंकलेखक, ९ रेकॉर्ड असिस्टंट, २ रक्तसंक्रमण अधिकारी अशा एकूण ११९ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…