Thursday, October 23, 2025
Happy Diwali

ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे Exclusive  फोटो 

ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे Exclusive  फोटो 

मुंबई: स्मॉल स्क्रीनवरील मोस्ट अवेटेड मॅरेज म्हणजे ओम आणि स्वीटूचं ....या दोघांचं लग्न कधी होणार याची उत्सुकता स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांना लागून राहिली होती आणि अखेर आता तो क्षण आला आहे जिथे स्वीटू ही ओमची होणार आहे. शुभमंगल सावधान म्हणत या दोघांनी लग्नाचे सगळे विधा परंपरिकरित्या पार पाडले.  रत्नागिरीत या दोघांंचं लग्न पार पडलं.

या लग्नासाठी स्वीटू लालरंगाची भरजरी साडी , गळ्यात परंपरिक दागिणे आणि नाकात नथ असा साजशृंगारात सजली होती.

तर ओमदेखील शेरवानी आणि फेटा अशा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसला...

 

 

  ओम आणि स्वीटूच्या लग्नात आधी खूपच विघ्न आली. खरंतर स्वीटू आणि ओमचं लग्न हे आधीच होणार होतं पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न  त्याप्रमाणे ओम आणि स्वीटूच्या लग्नातही अनेक अडचणी आले...त्यामुळे शेवटच्या क्षणी स्वीटूने ओमच्या गळ्यात वर माला घालण्याएवजी मोहितच्या गळ्यात वरमाला घातली..मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न याेतातच पण एवढा मोठा धक्का प्रेक्षकांच्या काही पचनी पडला नाही त्यामुळे ही मालिका खूपच ट्रोल झाली...

पण आता अनेक स्थित्यंतरानंतर स्वीटू ही ओमची झालीय या दोघांचं लग्न कोकणात पार पडलं आहे. 

 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >