सेंटो डोमिंगो : डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सेंटो डोमिंगोमध्ये एक खासगी विमान कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात ७ प्रवासी तर २ क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. हा अपघात लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हे विमान फ्लोरिडाहून इजाबेला येथे जात होते. घटनास्थळी बचावकार्याला सुरूवात केली आहे. मृतांची ओळख अदयाप पटलेली नाही.