Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीलोकअदालतीतून वीज ग्राहकांची २९४ प्रकरणे निकाली

लोकअदालतीतून वीज ग्राहकांची २९४ प्रकरणे निकाली

७३ लाख ९५ हजार रुपये वसूल

कल्याण : तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी २९४ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ७३ लाख ९५ हजार रुपयांच्या थकीत रकमेचा भरणा केला आहे.

कल्याण परिमंडलातील जवळपास ३८ हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलल्या ३७ हजार तर वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित एक हजार प्रकरणांचा समावेश होता. परंतु २९४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व ७३ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली.

कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ५९ ग्राहकांनी थकीत ३० लाख ७२ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत ३३ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या ११८ ग्राहकांची प्रकरणे समोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई व विरारमधील ३० ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ४ लाख २३ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत ८७ ग्राहकांनी ५ लाख २१ हजार रुपयांची थकीत रक्कम भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहाय्यक विधी अधिकारी राजीव वामन, शिल्पा हन्नावार, उपविधी अधिकारी दीपक जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -