मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ करोड सूर्य नमस्कार मारण्याच्या विश्वविक्रमाचा शुभारंभ योगऋषि स्वामी रामदेव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि आचार्य बालकृष्ण यांनी संयुक्तपणे पंतजली विश्वविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांसोबत पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे उत्साहपूर्ण वातावरणात केला.
यावेळी शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मध्य प्रदेश मध्ये योगाच्या स्वरूपात सूर्य नमस्कार मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यांनी या कार्यक्रमात मध्य प्रदेश सरकारच्या सहभागाची घोषणा केली.
स्वामी रामदेव म्हणाले की, सर्व संस्था या राष्ट्र वंदनाच्या ऐतिहासिक कामात सहभागी व्हाव्यात. सध्या तरी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या ५ संस्था पुढे आल्या आहेत. एकत्र येऊन या संकल्पाला पूर्ण करूया.