Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीशीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

मुंबई : देशात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Case) आईनेच आपल्या मुलीचा निर्घून खून केला होता. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) वेळोवेळी आपला जबाब बदलला आहे. त्यातच इंद्राणी मुखर्जीने आता शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला असल्यामुळे सगळेच जण चक्रावले आहेत.

२०१२ साली झालेल्या या घटनेत इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा हीचा खून केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रात तिने लिहिले आहे की, “काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की, तिला काश्मीरमध्ये शीना बोरा भेटली होती.” त्यामुळे तिने सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्राव्यतिरिक्त, शीना बोराने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे. यावर देखील लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक झाल्यापासून मुंबईतील भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. इंद्राणी मुखर्जी लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -