मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं.
४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर १५ मार्च 2022 ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.
दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे 25 टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.