बैलगाडी शर्यतीवर बंदी मागे घेतल्याबद्दल आनंद : देवेंद्र फडणवीस

  96

मुंबई, बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला



ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडी शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो.तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली.

अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली. ‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे. "

Comments
Add Comment

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै