Monday, July 22, 2024
Homeदेशलष्करप्रमुख जनरल नरवणे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त

लष्करप्रमुख जनरल नरवणे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त

नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत मराठमोळे लष्करप्रमुख जनरल नरवणेंकडे सोपवले नेतृत्व

नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) निधन झाले होते. रावत यांच्या निधनामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता नव्या सीडीएसची (CDS) नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था अस्थायीपणे लागू करण्यात आली आहे. त्यानुसार लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Genral M M Naravne) यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे.

देशात सीडीएसची व्यवस्था नव्हती तेव्हा देशामध्ये चीफ ऑफ डिफेन्स कमिटी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयाचे काम करत होती. या समितीमध्ये तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांचा समावेश आहे. परंतु जनरल एम. एम. नरवणे सर्वात ज्येष्ठ आहेत. सैन्यातील इतर दोन्ही दलांचे प्रमुख हवाई दल प्रमुख (Airforce Chief) एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदल प्रमुख (Indian Navy Chief) आर. हरी कुमार हे नरवणेंपक्षा ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांना या समितीचे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. तसेच देशाचे नवे सीडीएस म्हणूनसुद्धा जनरल नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत नव्या सीडीएसची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हीच व्यवस्था कायम राहणार आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीडीएसच्या अनुपस्थितीमध्ये ज्येष्ठ प्रमुख हे चीफ ऑफ स्टाफ समितीचे चेअरमनपद सांभाळतात. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ जे आतापर्यंत सीडीएस यांना रिपोर्ट करायचे ते आता जनरल एमएम नरवणे यांना रिपोर्ट करतील.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्सचेसुद्धा प्रमुख असतात. तसेच चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्समध्ये जे दुसरे सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे अॅडिशनल सेक्रेटरी असतात. या डिपार्टमेंटमध्ये अॅडिशनल सेक्रेटरी थ्री-स्टार मिलिट्री ऑफिसर असतात. आता हे पद लेफ्टिनंट जनरल अनिल पुरी यांच्याकडे आहे.

केंद्र सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये देशाचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यावेळी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी चेअरमन ऑफ द चीफ ऑफ कमेटी स्टाफ हे पद आहे. त्यावेळी सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये जो अधिकारी वरिष्ठ आहे, त्यांच्याकडे हे पद दिले जाते. आता सीडीएस पद रिक्त आहे. यामुळे तिन्ही सैन्यात ताळमेळ राखण्यासाठी परंपरेनुसार पदावर नियुक्ती करण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -