Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

भिवंडी (वार्ताहर) : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ पाडा व संभाजी चौक येथे नगरसेवक अरुण राऊत आणि अभिषेक राउत यांच्या उपस्थितीत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत, तसेच ओला कचरा व भाजीपाल्याचा कचरा, जेवणाचा खरकटा, फळांच्या साली, कागद-प्लास्टिक भंगारवाल्यांना विकण्याबाबत त्याचप्रमाणे सिंगल युस प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून शहरातील आरीफ गार्डन येथील खत निर्मूलन केंद्रात खत बनवणे अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.



यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप खाणे, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी.विशे, आरोग्य निरीक्षक दिपक धनगर, महेश दुसा, दिगंबर जाधव, मुकेश सुर्वे, महेश सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते





Comments
Add Comment