Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीवसईत पहिल्या पत्नीचा लग्नात धिंगाणा

वसईत पहिल्या पत्नीचा लग्नात धिंगाणा

नालासोपारा (वार्ताहर) : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे एका नवरोबाला चांगलेच महागात पडले आहे. दुसरे लग्न धुमधडाक्यात सुरू असताना पहिल्या पत्नीने लग्नात धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विवाहाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना धक्का बसला. या घटनेने नवरदेवही हैराण झाला.


वसईत पार पडत असलेल्या लग्नात हा प्रकार घडला. पत्नीने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नात राडा केला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचे दुसरे लग्नच उधळून लावले. पतीचे लग्न सुरू असतानाच पहिल्या पत्नीने हॉलमध्ये धाड घालून राडा केला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्नच मोडून टाकले.


वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉलमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग असे पतीचे नाव असून, कांचन सिंग असे पत्नीचे नाव आहे. २०१२ मध्ये या दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला होता. पतीने या विवाहात हुंडाही घेतला होता. मात्र, सहा महिन्यांतच पतीने पत्नीला दूर केले होते.


या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच रविवारी पती दुसरे लग्न करत असल्याचे कांचनला समजले आणि तिने मग भर लग्नमंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरे लग्न होता होता थांबले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -