Friday, October 24, 2025
Happy Diwali

पार्कोस ब्युटी अवॉर्डची घोषणा

पार्कोस ब्युटी अवॉर्डची घोषणा

मुंबई : पार्कोस ब्युटी इंप्लूएन्सर अवॉर्ड २०२२ घोषणा नुकतीच करण्यात आली. ब्युटी, लाइफस्टाइल आणि लग्झरी अशा चार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २३ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

अवॉर्ड निवडीतील परिक्षक (ज्युरी) म्हणून फॅशन डिझायनर नरेंद्र कुमार, फॅशन फोटोग्राफर जतीन कम्पानी, सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट क्लिंट फर्नांडेस, सेलेब्रिटी स्कीन एक्सपर्ट डॉ. हर्षना बिजलानी, सेलेब्रिटी हेअरस्टायलिस्ट अनीस मुस तसेच एल्ले, इंडियाच्या डायरेक्टर कामना मलिक यांचा समावेश आहे.

या पुरस्काराच्या प्रवेशिका ऑनलाइन स्वीकारल्या जाणार आहेत. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२२ आहे. फॉलोअर्स त्यांची मते १८ जानेवारीपर्यंत नोंदवू शकतात. पार्कोस ब्युटी इंप्लूएन्सर अवॉर्ड विजेत्यांना २१ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात गौरवण्यात येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >