Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार : डॉ अमोल कोल्हे

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार : डॉ अमोल कोल्हे

मुंबई :  बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल खासदार आणि अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला .

फेसबुक द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले, “जय शिवराय, अतिशय आनंदाची बातमी सांगतोय, आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार….होय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावर आज मा. न्यायालयाने आज निकाल दिला. बैलगाडा मालक , शौकीन , बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निकालाबद्दल मी तमाम बैलगाडा मालकांचे, शौकिनांचे, प्रेमींचे मनापासून अभिनंदन करतो. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिलजी केदार व राज्य सरकार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

बैलगाडा शैर्यतीसंबंधी त्यांची भेट घेतल्यापासून माननीय पशुसंवर्धन मंत्री व महाराष्ट्र सरकारने मोठ्या तडफेने न्यायालयात बाजू मांडली आणि त्यामुळेच आज हा निर्णय आपल्या बाजूने लागला आहे असे मी प्रामाणिकपणे नमूद करतो. वेळोवेळी यासंदर्भात आवाज उठवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील या सर्वांचेही मनापासून आभार. यासोबतच सर्वसामान्य जनतेने देखील याबद्दल संयम दाखवित शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. वेळोवेळी या लढ्याला ताकद देण्याचं काम केलं याबद्दल त्यांचेही आभार.

पण आजचा विजय हा अंतिम नाही याचीही जाणीव मी सर्वांना करून देऊ इच्छितो. द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला आजचा निर्णय ५ सदस्यीय खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत लागू असेल. तामिळनाडू, कर्नाटक या इतर राज्यांसमवेत महाराष्ट्राच्या याचिकेची एकत्रित सुनावणी ही ५ सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या न्यायालयीन तसेच संसदीय प्रक्रियेची तयारी आपण अव्याहतपणे सुरु ठेवणार आहोत जेणेकरून आजचा मिळालेला तात्पुरता दिलासा आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. यासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. म्हणूनच ही शर्यत देखील आपणच जिंकू याचा विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार… ! ”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -