नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांचे नवीन आधुनिक तेजस गाड्यांमध्ये रूपांतर करून अधिक आरामदायी सोयीसुविधांसह रेल्वे प्रवासाचे नवे युग सुरू केले आहे. रेल्वेने तेजसच्या धर्तीवर 4 राजधानी गाड्यांमध्ये आधुनिक बदल केले आहेत.
भारतीय रेल्वे तेजस स्लीपर कोचेससह 4 राजधानी गाड्या चालवत आहे. रेल्वेच्या एलएचबी प्लॅटफॉर्मवर स्लीपर कोचसह अत्याधुनिक तेजस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक गाड्यांमध्ये स्वयंचलित प्रवेश दरवाजे आणि प्रवासी माहिती प्रणाली आहे.
तसेच आग आणि धूर शोध आणि शमन प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.सुधारित शौचालय- जैव-शौचालयांसह व्हॅक्यूम असिस्टेड फ्लशिंग, उच्च दर्जाची टॉयलेट फिटिंग, टच फ्री सोप डिस्पेंसर, बसण्यासाठी विशेष कक्ष देण्यात आले आहेत. त्यासोबतचएलईडी दिवे, सुरेख रंगसंगती इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. तेजस डब्यांसह सुधारित पहिली राजधानी गाडी दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेने जुलै 2021 मध्ये चालवली होती.