Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मनसेला सोडचिठ्ठी देणा-या रुपाली पाटील विरोधात संदीप देशपांडेंचे ट्विट!

मनसेला सोडचिठ्ठी देणा-या रुपाली पाटील विरोधात संदीप देशपांडेंचे ट्विट!

मुंबई : मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन रुपाली पाटील यांच्या जाण्याने पक्षाला फारसा फरक पडत नसल्याचे सूचित केले आहे. सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!', असा मजकूर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीला आहे.


https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1470925559685267460

रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मंगळवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला होता. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत, असे रुपाली पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment