मुंबई: राज्य सरकारनं किराणा दुकान, डिपार्टमेंटल स्टोर, बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडणार आहे. मात्र वाईनची किती विक्री होते याची नोंद सरकारला ठेवता येणार आहे.. सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
या नव्या धोरणांमुळे सरकारनं काल वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून विक्रीला येऊ शकते.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…