बंगळुरु : तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे आज निधन झाले. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा मृत्यू झाला होता. फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते.
ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले.