Sunday, October 26, 2025
Happy Diwali

चंद्रकांत पाटील हे महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे - अतुल लोंढे

चंद्रकांत पाटील हे महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे - अतुल लोंढे

मुंबई : शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने आता टीकेचे मोहोळ उठले आहे. या वक्तव्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे.

चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत. महाराजांचे राज्य जातीपाती, धर्माच्या पलीकडले होते, स्त्री सन्मान करणारे रयतेचे राज्य होते, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.

याउलट नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे आहेत. त्यांनी देशातील ८० कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्य्ररेषेखाली नेले. त्यांच्या विचारसरणीत स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना कधीही खपवून घेणार नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

Comments
Add Comment