मुंबई : बिग बॉस मराठी सिझन तिसरा आता अंतिम टप्प्यावर आला असला तरीदेखील सदस्यांचे रूसवे – फुगवे, भांडण, मतभेद, द्वेष काही संपायचे नावं घेत नाहीयेत. टीम B मध्ये आता बहुमत असले तरीदेखील त्यांच्यातील मतभेद सुध्दा तितकेच वाढल्याचे दिसून येते. कोणालाच कोणाचं मतं पटतं नाहीये असं वाटतं आहे. कालपसून विकास आणि मीनलमध्ये वादाची ठिणगी पडली आणि जोरदार राड्याला सुरुवात झाली. हे सदस्य टास्कमध्ये झालेल्या गोष्टी घरात घेऊन येतात. त्यामुळे हा गुंता अधिकच वाढतो. आज एकीकडे विशाल – विकास तर दुसरीकडे मीनल – सोनाली चर्चा करताना दिसणार आहेत. इथेच हे थांबले नसून पुन्हा चौघजण एकत्र सकाळी चर्चा करताना देखील दिसून येणार आहेत.
विशाल विकासशी बोलताना दिसणार आहे, तू आता हे बोलतो आहेस, तू माझ्या ठिकाणी असतास तर हे बोलला नसतास, मी सांगतो ना. विकास म्हणाला, मी बोललो असतो. मी चुकीचा आहे ठरवतो आहेस तू. मला हे म्हणायचे आहे सोनाली किंवा इतर चिडत का नाही मला माहिती नाही, पण त्या एका गुणाचं का महत्व आहे ते मला माहिती आहे. त्या लोकांना माहिती नाहीये. विशाल म्हणाला, मी तुला हेच सांगायचं आहे, टीम A म्हणजे फक्त ती लोकं नाही तुदेखील आहेस त्यात… तू तुझ्या ठिकाणी बरोबर स्टँड घेतला आहेस. दुसरीकडे, मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे, तो जो टास्क आहे ना हॅप्पी बर्थडे… तो तुझ्यामुळे तिथपर्यंत तरी पोहचला. नाहीतर काहीच झालं नसतं. विकास पाटील काहीच व्यवस्थित खेळत नव्हता. कोणती आयडिया आहे जी त्याने लावली. तुमचीच होती आयडिया. प्लेअर म्हणून तो खूप चुकला आहे.