

विशाल विकासशी बोलताना दिसणार आहे, तू आता हे बोलतो आहेस, तू माझ्या ठिकाणी असतास तर हे बोलला नसतास, मी सांगतो ना. विकास म्हणाला, मी बोललो असतो. मी चुकीचा आहे ठरवतो आहेस तू. मला हे म्हणायचे आहे सोनाली किंवा इतर चिडत का नाही मला माहिती नाही, पण त्या एका गुणाचं का महत्व आहे ते मला माहिती आहे. त्या लोकांना माहिती नाहीये. विशाल म्हणाला, मी तुला हेच सांगायचं आहे, टीम A म्हणजे फक्त ती लोकं नाही तुदेखील आहेस त्यात... तू तुझ्या ठिकाणी बरोबर स्टँड घेतला आहेस. दुसरीकडे, मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे, तो जो टास्क आहे ना हॅप्पी बर्थडे... तो तुझ्यामुळे तिथपर्यंत तरी पोहचला. नाहीतर काहीच झालं नसतं. विकास पाटील काहीच व्यवस्थित खेळत नव्हता. कोणती आयडिया आहे जी त्याने लावली. तुमचीच होती आयडिया. प्लेअर म्हणून तो खूप चुकला आहे.
