Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीपालिकेने दिलेल्या भाड्याचा वापर नेमका कुठे झाला?

पालिकेने दिलेल्या भाड्याचा वापर नेमका कुठे झाला?

मुलुंड कोविड सेंटरच्या खर्चावरून भाजपचा सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : मुलुंड येथील रीचर्डसन अँड क्रुडास जम्बो कोविड सेंटरच्या खर्चावरून मंगळवारी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत विषय उपस्थित केला. तसेच या प्रस्तावात नियमांची पायमल्ली झाली असून हा प्रस्ताव फेरविचारार्थ परत पाठवा अशी मागणी देखील शिंदे यांनी केली. मुलुंड येथील कोविड सेंटरला भाड्यापोटी ११ कोटी देताना नेमक्या काय उपाययोजना केल्या? नेमके भाडे किती? याआधी सिडकोने किती भाडे दिले? किती दिवसांसाठी भाडे द्यावे लागणार? असे प्रश्न भाजप स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केले.

कोरोना काळात केलेल्या खर्चाला मंजुरी देताना स्थायी समिती सदस्यांना कुठलीही माहिती दिली जात नाही. तर मुलुंड येथील कोविड सेंटरची जागा सिडकोची असून भाड्यापोटी १० कोटी ९० लाख रूपये एवढी रक्कम देताना स्थायी समितीला त्याची इत्यंभूत माहिती देणे आवश्यक आहे. मात्र परिपत्रकानुसार सर्व खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांना आर्थिक बाबी अंतर्गत असलेले महसूल विषयक सर्व प्रस्ताव प्रमुख वित्त लेखापाल यांच्यामार्फत सादर करावेत अशा सूचना असतानाही त्याचे उल्लंघन केले जात आहे. कोरोना काळातील प्रस्ताव लेखा विभागाच्या पडताळणीशिवाय समितीत आणले जातात, असा आरोपही शिंदे यांनी केला आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -