सोलापूर : अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष उत्पादन संकटात सापडले आहेत. शासनाच्या मदतीशिवाय बागाईतदारांना जगणे अशक्य आहे. शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी केली आहे. पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उत्तर तालुक्यातील पडसाळी, नान्नज व दारफळ येथील द्राक्षबागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात जवळपास ५ लाख एकर द्राक्ष क्षेत्र आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांची द्राक्ष उत्पादकांची अवस्था शासनाला माहीतच आहे. यावर्षी जून महिन्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिला. त्यामुळे राज्यात दोन लाख एकरांवरील बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदारांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाने द्राक्ष बागांसाठी पॅकेज देण्याची मागणी पवार यांनी केली. द्राक्ष शेती वाचली नाही तर शासनाला करही मिळणार नाही, असे पवार म्हणाले.
सोलापूर – राज्यात २ लाख एकरांवरील द्राक्षाचे नुकसान, अवकाळी पावसाचा फटका