Friday, October 24, 2025
Happy Diwali

“आज बिग बॉसच्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क ”

“आज बिग बॉसच्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क ”

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे जंगी सेलिब्रेशन, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. सदस्यांवर एका मागून एक बॉम्ब फुटत आहेत. काल बिग बॉस यांनी जाहीर केले बिग बॉसचा वाढदिवस संपूर्ण आठवडा सुरू असणार आहे आणि या दरम्यान सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार आहेत. आज घरामध्ये रंगणार आहे नॉमिनेशन टास्क. बघूया सदस्य कोणाला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट करणार आणि कोणते सदस्य सेफ होणार. मीनल घराची कॅप्टन असल्याने पहिले नॉमिनेशन करण्याची संधी तिला दिली गेली. याचसोबत या प्रक्रियेत मीनल सेफ असून ६ लाख रुपये देखील सेफ आहेत असे जाहीर केले.

 


 
आज नॉमिनेशन कार्यावरून मीरा आणि विकासमध्ये चर्चा रंगणार आहे. मीरा विकासला विचारताना दिसणार आहे, मला एवढं सांग मी खरंच काही नाही खेळली आहे ? विकास तिला यावर आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.  विकासचे म्हणणे तिला पटते, इथे असलेला प्रत्येक सदस्य विनर होऊ शकतो. त्यावर मीरा म्हणाली, तुझ्या लिस्टमध्ये तर मी नव्हतेच. इथे फक्त टास्कमधले निकष तुम्ही लावताय... मग मी पण उद्या सगळ्यांना सांगेन एक वर्ष तुम्ही रेसलिंग करा, मग या इकडे...”


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >