Saturday, October 25, 2025
Happy Diwali

लहान मुलांसाठी येणार 'कोवाव्हॅक्स' लस

लहान मुलांसाठी येणार 'कोवाव्हॅक्स' लस

मुंबई : लहान मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनाची कोवाव्हॅक्स  ही लस येणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोवाव्हॅक्स लाँच करेल, अशी माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.  

अदर पुनावाला मंगळवारी सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये  बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी कोवाव्हॅक्सची चाचणी सुरू आहे. कोवाव्हॅक्स ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे. अशी माहितीही पुनावाला यांनी दिली. 

Comments
Add Comment