Tuesday, June 17, 2025

बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा

बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा

कल्याण : बोगस वैद्यकीय कागदपत्रांच्या माध्यमातून डॉक्टर असल्याचा बनाव करीत म्हारळ येथील क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर टिटवाळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.


म्हारळ येथील लक्ष्मी छाया क्लिनिकमध्ये अनुप रामजी जोंधळे (वय ३६ वर्षे) राहणार म्हारळ यांने डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांवर उपचार करत होता. १२वी नंतर एक्सरे टेक्निशयन कोर्स केलेल्या अनुप याने बोगस डॉक्टर प्रमाणापत्राद्वारे डॉक्टरकी व्यवसाय सुरु केला. अनुपचे वडील हे डॉक्टर होते. त्यांचे क्लिनिक होते.


कोरोना काळात त्याचे वडील रामजी यांचे निधन झाल्याने बोगस कागदपत्राच्या आधारे आपण डॉक्टर आहोत असे भासवित रुग्णांवर उपचार सुरू केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा