Sunday, April 20, 2025
Homeमहत्वाची बातमीअकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा दारुण पराभव

अकोला : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.

अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. तरीही भाजपने बाजी मारत शिवसेनेच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला.

भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा आमनेसामने आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे.

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षापासून इथं शिवसेना-भाजप युतीच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. मात्र आता तब्बल 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार येथे विजयी झाला आहे. वसंत खंडेलवाल यांचा विजय झाल्याने अकोल्यात जल्लोष साजरा करण्यात आला.

दरम्यान, नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -