Saturday, June 21, 2025

'एक भारत श्रेष्ठ भारत' प्रदर्शनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

'एक भारत श्रेष्ठ भारत' प्रदर्शनाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी हैदराबाद शहरातील पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ (ईबीएसबी) या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक जनसंपर्क विभागाद्वारे आयोजित, या प्रदर्शनात हरियाणा आणि तेलंगणा या (एक भारत- श्रेष्ठ भारत) संलग्न राज्यांमधील कलाप्रकार, पाककृती, उत्सव, स्मारके, पर्यटन स्थळे इत्यादी विविध मनोवेधक पैलू मांडण्यात आले आहेत.


अशाप्रकारचे उपक्रम संलग्न राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांमधील परस्पर संपर्कांला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत करतील, असे नायडू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. दोन्ही राज्यातील लोकांना एकत्र आणणाऱ्या आणि आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमासाठी त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची प्रशंसा केली.


एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम हा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या देशातील लोकांमधील भावनिक बंध बळकट करण्यासाठी सरकारचा एक अनोखा उपक्रम आहे. या प्रदर्शनात प्रकाशन विभागातर्फे कला आणि संस्कृती या विषयांवरील उल्लेखनीय पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment