Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अंधेरीत दहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, पाच जण गंभीर जखमी

मुंबई : अंधेरी येथील महाकाली सोसायटीत केबल तुटल्याने बिल्डिंगमधील लिफ्ट थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या गोंदवली बस स्टॉप समोर महाकाली सोसायटी आहे. या ठिकाणी दहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये ३ मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. एसआरए प्रकल्पाअंतर्गत उभारलेली ही १६ मजली इमारत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लिफ्टमधील लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. बचावकार्यानंतर या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

जखमी झालेल्यांना आदित्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment