Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीये बात ! सुश्मिता सेनने केलं हरनाज संधूचं कौतुक

ये बात ! सुश्मिता सेनने केलं हरनाज संधूचं कौतुक

मुंबई: भारताच्या हरनाज संधूने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मिस युनिव्हर्स किताबावर मोहर उमटवल्यामुळे तिच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यात सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेननेदेखील ट्विटवरून हरनाजचं तोंडभरून कौतुक केलंय…

‘ये बात, हर हिंदुस्तान की नाज..”हरनाज कौर संधू. ‘Miss Universe 2021’ India so proud of you.

अभिनंदन आणि भारताला जागतिक स्तरावर इतक्या सुंदररित्या रिप्रेझेंट केल्याबद्दल तुझे खूप आभार’. असं ट्विट सुश्मिताने केलं आहे. 

याआधी अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Datta) २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात आणला.

हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -