मुंबई : मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंतचा (१३) अल्टिमेटम दिल्यानंतरही एसटी कर्मचारी आतापर्यंत कामावर रूजू व्हायला तयार नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) विभागाचे कर्मचारी दिवाळीपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
या संपामुळे महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा महसुल बुडाला आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचे नाहक हाल सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतरही राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे.
त्यामुळे या संपावर तोडगा निघणार ही नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशी मात्र एसटी कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत.