Thursday, June 19, 2025

सुरक्षा रक्षकांचे सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणा देत राहील : पंतप्रधान

सुरक्षा रक्षकांचे सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणा देत राहील : पंतप्रधान

नवी दिल्ली : संसदेवर २००१ साली झालेल्या हल्याच्या वेळी, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा रक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आदरांजली अर्पण केली (Prime Minister pays tributes) तसेच जवानांचे अभिवादन आणि स्मरण केले.


ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "२००१ साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आकर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो. देशाप्रती त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहील."

Comments
Add Comment