नवी दिल्ली : उत्तराखंडचे जेष्ठ भाजप नेते व डेहराडूनच्या (Dehradun) कॅंट भागातील भाजप आमदार हरबन्स कपूर (Harbans Kapoor) यांचे निधन झाले. हरबंस कपूर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीव्र शोक व्यक्त केला आहे. (Prime Minister pays tributes to harbans kapoor)
ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजप उत्तराखंडचे जेष्ठ सहकारी हरबंस कपूर जी त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. ते एक जेष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रशासक होते. सामाजिक सेवा आणि कल्याण क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी हरबंस कपूर सदैव लक्षात राहतील. समर्थक आणि कुटुंबीयांना संवेदना. ओम शांती.” असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.
कपूर सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरबन्स कपूर यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.