Sunday, October 26, 2025
Happy Diwali

रोहित शर्मा स्नायूदुखीमुळे दक्षिण आफ्रीकेच्या दौ-याबाहेर

रोहित शर्मा स्नायूदुखीमुळे दक्षिण आफ्रीकेच्या दौ-याबाहेर

मुंबई (प्रतिनिधी): आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच्या सरावादरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान, थ्रो डाउन स्पेशलिस्ट राघवेंद्र यांनी टाकलेला चेंडू रोहितच्या थेट पायावर आदळला. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याचे अपडेट अद्याप बीसीसीआयने दिले नाहीत.


सोमवारच्या सरावात सुरुवातीला माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला. रहाणेनंतर रोहित सरावासाठी आला. सराव करताना चेंडू त्याच्या पायाला लागला. चेंडू लागल्यावर तो कळवळला. त्यानंतर रोहित बराच वेळ शांत आणि नर्व्हस दिसत होता. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे रोहितकडे अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी आहे. पण त्याची ही दुखापत पाहता रोहित शर्मा आता दक्षिण आफ्रीकेच्या दौराला मुकणार आहे असं दिसतं.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचे क्रिकेटपटू १६ डिसेंबर रोजी मुंबईतून रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेले क्रिकेटपटू सध्या मुंबईत क्वारंटाइनमध्ये आहेत. कसोटी संघातील खेळाडूंचा सराव सुरू आहे.

Comments
Add Comment