मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेसच्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण लवकरच मेट्रो ७ मुंबईकरांच्या भेटीला येतेय. ‘मेट्रो ७’ ही अंधेरी ते दहीसर या रेल्वेमार्गावरून धावणार आहे. नवं वर्षात मुंबईकरांना हे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकर भलतेच खूश झाले आहेत.
मुंबईकरांची होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे निश्चित स्थळी पोहचण्याचा लागणार वेळ हे सारं काही आता टाळता येणार आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएमआरडी’ने ‘मेट्रो ७’ चा पर्याय निवडला होता. जवळपास १६ किलोमीटर इतक्या लांबीचा हा मेट्रो प्रवास असणार आहे. तब्बल सहा हजार दोनशे आठ कोटी रुपये खर्च करून ‘मेट्रो ७’ ची रचना करण्यात आलीय. संपूर्ण वातानुकूलीत असेलली ही मेट्रो मुंबईकरांना नक्कीच दिलासा दिणारी ठरेल.