
मुंबई (हिं.स) : गोव्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करीत त्यांचे अभिवादन आणि स्मरण केले.
ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आधुनिक गोव्याचे शिल्पकार: मनोहरभाई पर्रीकर!
साधे, सच्चे, प्रामाणिक, असामान्य नेते,गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकरजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! ”
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एका विशेष चित्रफीत देखील प्रदर्शित केली.
विविध भूमिकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि मनोहर पर्रीकर यांनी अनेक वर्ष सोबत कार्य केले होते. मनोहर पर्रीकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले अनुबंध होते.
प्रथम भाजप संघटन, त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यात आणि कार्यक्रमात ते सामील आणि कार्यरत होते. मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत भाजपची ही पहिली निवडणूक असणार आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस प्रभारी आहेत.