Sunday, September 14, 2025

वांद्रेत बुधवार, गुरूवारी कमी दाबाने पाणी

मुंबई : महापालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम बुधवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवार दि. १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण वांद्रे पश्चिम म्हणजेच एच / पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

संबंधित नागरिकांनी आदल्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व काटकसरीने पाणी वापरुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment